Gopichand Padalkar 
महाराष्ट्र

व्हिडिओ : 'वडेट्टीवरांच्या बड्या बाता अन् 'धोरण' खातंय लाथा'

विजय पाटील

सांगली : अति सन्मानीय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटके विद्यार्थ्यांचा कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ आणि हसं या प्रस्थापितांच्या सरकारने करून ठेवले आहे अशी टीका गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केली आहे. ते सांगली येथील झरे गावी बोलत होते.

बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा अशी वडेट्टीवरांची गत झाली आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचे दाखवायचे आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार साहेबांच धोरण राहिलेलं आहे असेही पडळकरांनी नमूद केले. gopichand padalkar on mahajyoti vijay-wadettivar decision obc students

पडळकर म्हणाले एमपीएससी आणि युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परिक्षा घेतली. यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देते. मात्र दुसरीकडे सारथी संस्था आणि बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देते. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योतीमात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करीत आहे.

सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केले तर तीन दिवसात निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत अशी जहरी टीका पडळकर यांनी केली आहे. महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? हे वडेट्टीवारांनी स्पष्ट करावे अशी मागणी पडळकरांनी करुन प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT