Gopichand Padalkar - Sharad Pawar - Saam Tv
महाराष्ट्र

'त्या' सभासदांचा मतदानाचा हक्क काढून घेतला, हा कुठला न्याय? गाेपीचंद पडळकर

आपल्या सिल्व्हर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही.

विजय पाटील

सांगली : मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी (msrtc employee) आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटींची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केली आहे. एसटी बँकेची निवडणूक (msrtc bank election) लागली आहे. जे सदस्य थकबाकीदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा आदेश काढण्यात आला आहे. त्यावर आमदार पडळकर यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. (msrtc bank election marathi news)

आमदार पडळकर म्हणाले सन १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली आणि सभासद फी च्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाच्या नावाखाली ५०० रूपये आणि वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलिशान गाड्या खरेदी करून दिल्या.

परंतु ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीच्या नात्याने आपल्या सिल्व्हर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. या मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत असे आमदार पडळकरांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संध्याकाळी ५ वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT