पालकांसाठी आनंदाची बातमी; खाजगी शाळांच्या फीमध्ये होणार कपात Saamtv
महाराष्ट्र

पालकांसाठी आनंदाची बातमी; खाजगी शाळांच्या फीमध्ये होणार कपात

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने खाजगी शाळांतील १५ टक्के फी कपातीच्या आदेशाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत आहे. या कोरोना Corona काळात अनेकांचे रोजगार गेले तर अनेक व्यवसायिक डबघाईला आले आहेत. अनेकांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. एकंदरीतच सर्वच स्तरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना खाजगी शाळा मात्र विद्यार्थ्यांच्या फीमध्ये Fees कोणत्याही प्रकारची सवलत Reduction द्यायला तयार नव्हत्या. जवळपास दीड वर्ष शाळा बंद असून ऑनलाईन Online पद्धतीने शिक्षण Education चालू आहे. असे असतानाही खाजगी शाळा पूर्ण फी वसूल करत आहेत. याविरोधात राज्यभरातून पालक संघटनांनी, विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी आंदोलने करण्यात आली आहेत.

मात्र, आता राज्य सरकारने खाजगी शाळांमधील फीबाबत मोठा निर्णय घेतला असून मुलांच्या शाळेच्या फी बाबत चिंता सतावत असलेल्या, पालकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने खाजगी शाळांतील १५ टक्के फी कपातीच्या आदेशाला मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे.

१५ टक्के फी कपातीबाबतचा अध्यादेश राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर काढण्यात येणार आहे. जवळपास दोन वर्षांपासून आथिर्क चणचणीत असलेल्या पालकांना राज्य सरकारच्या फी कपातीबाबतच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. फी कपातीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) आदेश दिले होते. महाविकास MVA आघाडी सरकारने उशिरा का होईना पण फी कपातीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे पालकांमधून व विद्यार्थ्यांमधून स्वागत करण्यात येत आहे. कोरोना काळात पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT