Manmad Vande Bharat Express Stop saam tv
महाराष्ट्र

Manmad Vande Bharat : मनमाडकरांसाठी खुशखबर! आणखी एक वंदे भारत थांबणार, तिकिट किती?

Vande Bharat Express Update: मनमाडकरांसाठी महत्त्वाची रेल्वे अपेडस समोर आली आहे. आता मुंबई–शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मनमाड जंक्शनवर थांबा मिळाल्याची माहिती आहे.

Sakshi Sunil Jadhav

मनमाडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड जंक्शन येथे थांबा मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मनमाडसह परिसरातल्या प्रवाशांना आधुनिक आणि वेगवान रेल्वे प्रवासाची सुविधा मिळायला मदत होणार आहे.

आता या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. मनमाड हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून, येथून मुंबई, नाशिक, शिर्डी आणि इतर प्रमुख शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते.

मुंबई–शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग कोणता?

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डी हा या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे मुंबई आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि इतर प्रवाशांचा प्रवास हा धावपळीत न जाता आरामदायी होईल. मनमाड जंक्शनला थांबा मिळाल्यामुळे या परिसरातल्या प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

वंदे भारतचे तिकीट किती? मनमाडहून संभाव्य भाडे किती असू शकते?

मनमाडकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेसच्या थांब्याची बातमी आनंदाची असली, तरी या गाडीने प्रवास करण्यासाठी नेमके किती पैसे मोजावे लागतील, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मुंबई CSMT ते साईनगर शिर्डी या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे सुरुवातीचे जाहीर भाडे खानपानासह चेअर कारसाठी ९७५ आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी १८४० होते.

खाण्यापिण्याच्या खर्चाशिवाय हे दर अनुक्रमे ८४० आणि १६७० होते. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट प्रवासाचे अंतर, चेअर कार (CC) किंवा एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) या आसनप्रकारानुसार बदलते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT