Arrest Saam Tv
महाराष्ट्र

सव्वा लाखांत मुलाची विक्री झाल्यानं आईला बसला धक्का; पाच अटकेत, एक फरार

एका संशयीत आराेपीचा शाेध सुरु असल्याची माहिती महेश बनसोड (गोंदिया शहर पोलिस) यांनी दिली.

अभिजीत घोरमारे

गोंदिया (gondia crime news) : सहा वर्षाच्या मुलाच्या विक्री प्रकरणी गोंदिया (gondia) शहर पाेलिसांनी पाच जणांना अटक (arrest) केली आहे. यामध्ये मुलास खरेदी करणा-या दांपत्यास देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कजोळ छोटीलाल भुरे, अनिता कजोळ भुरे, (आंधळगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा), मंगला ऊर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे (कुंभारेनगर, गोंदिया), सुखदेव केशोराव डोये (सकरला आंधळगाव) अनिता अरविंद हटवार (चिंचोली, आंधळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील सहाव्या संशयितांचा पाोलिस (police) शाेध घेताहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी : पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळायला देऊन स्वत: दुसरे लग्न करणा-या एक महिला दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास संशयित आराेपींकडे गेली. परंतु, ज्यांना आपला मुलगा दिला होता. ताे त्यांच्याजवळ नव्हता आणि आपला मुलगाच नाही अशी खात्री पटताच त्या महिलेनं (आई) (mother) गोंदिया शहर पोलिसांत (gondia city police station) धाव घेतली. गोंदिया शहर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता सहा वर्षांच्या मुलाची एक लाख २० हजार रुपयांत भंडारा (bhandara) जिल्ह्यात विक्री झाल्याची माहिती समाेर आली.

त्यानंतर गोंदिया शहर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. यामधील पाच संशयीत आराेपींना अटक करण्यात आली आहे. एका संशयीत आराेपीचा शाेध सुरु असल्याची माहिती महेश बनसोड (गोंदिया शहर पोलिस) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT