Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: मोबाईल ॲपवर दुचाकीचा फोटो टाकताच अडकले चोरटे

मोबाईल ॲपवर दुचाकीचा फोटो टाकताच अडकले चोरटे

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदियातून चोरी केलेली दुचाकी ओएलएक्स मोबाइल ॲपच्या माध्यमातून जाहिरात देऊन विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्‍यांचा हा प्रयत्‍न फसला असून विक्री करणाऱ्या दोन आरोपींना (Gondia) गोंदिया जिल्हाच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. (Tajya Batmya)

गोंदिया तालुक्यातील दत्तोरा कृष्णा यादवराव गायधने यांची मोटरसायकल ही टीबी टोली ग्राउंडमधून ३० जानेवारीला चोरीला गेली होती. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांकडून (Police) तपास सुरू होता. परंतु, चोरटे हातात लागत नव्‍हते. या दरम्‍यान चोरट्यांनी गाडी विक्रीसाठी मोबाईल ॲपवर गाडीचा फोटो लोड केला अन्‌ येथेच त्‍यांचा प्रयत्‍न फसला.

मध्‍यप्रदेशातून चोरटे ताब्‍यात

आरोपीला मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्‍ह्याच्या वाराशिवणी येथून एक आरोपी गोपेंद्र बघेल याला अटक केली. त्याच्या कडून माहिती घेऊन दुसरा आरोपी दिपकनाथ परिहार (रा. बरघट शिवणी मध्यप्रदेश) यालाही अटक करुन त्याच्या जवळून मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT