Zp School  Saam tv
महाराष्ट्र

दप्‍तराविना विद्यार्थी जाणार शाळेत; कशी असेल दफ्तरमुक्त शाळा वाचा...

दप्‍तराविना विद्यार्थी जाणार शाळेत; कशी असेल दफ्तरमुक्त शाळा वाचा...

अभिजीत घोरमारे

गोंदिया : वाढलेली स्‍पर्धा यामुळे अगदी पहिलीपासूनच पाठीवर दप्‍तराचे ओझेही वाढले. परंतु, दप्‍तरमुक्‍त शाळा ही संकल्‍पना जरा अचंबितच आहे. परंतु, गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘दप्तर मुक्त शाळा’ हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश (Zilha Parishad) जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी आदेश काढले आहेत. (Gondia Zilha Parishad News)

विद्यार्थ्यांच्या (Student) दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होउ नये; तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक सर्व व खेळामध्ये रुची वाढ़ावी हा त्या मागील उद्देश आहे. त्यामुळे अभ्यासाचा तणावात असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या निर्णयाचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वागत केले आहे.

शाळेतील साधन सामुग्रीतून ज्ञान

शिकण्यासाठी ताण विरहीत वातावरण मिळायला हवे. म्हणुन दप्तर विरहीत दिन आठवड्यातुन एक दिवस शनिवारी साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमातुन विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे एक दिवस का होईना कमी होणार आहे. पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाउन त्यांना शाळेत, शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधन सामुग्री मधुनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता यावे; याकरिता त्यांना आठवड्यातुन एकदा दप्तराच्या ओझ्यापासुन मुक्तता देण्यात येत आहे.

यावरही मार्गदर्शन

सदर उपक्रमात कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव या विषयांना प्राधान्य देण्यात यावे. शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात यावी, परिपाठ, योगासने, कवायत, वाचन, कार्डाव्दारे प्रकट वाचन, वैयक्तिक, सामुहिक मराठी, इंग्रजी व हिंदी कविता गायन, विवधि खेळाच्या स्पर्धा, नृत्यस्पर्धा, सामान्यज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT