Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: खळबळजनक! जंगली डुक्कर मारण्यासाठी सापळा रचला... शॉक लागून त्यांच्याच सहकाऱ्याचा झाला मृत्यू

Gondia News Update: जंगली डुक्कर मारण्याच्या हेतूने लावलेल्या विद्युत प्रवाहच्या तारेचा शॉक लागून त्यांच्याच एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील येत असलेल्या मानेगाव या गावी शेता जवळ येणारे जंगली डुक्कर मारण्याच्या हेतूने अवैधपणे इलेक्ट्रिक करंट लावून ठेवलेला होता. दुर्देवाने या तारेचा शॉक लागून त्यांच्याच एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक म्हणजे ही बाब लपवण्यासाठी कोणाला सांगितली नव्हती. या प्रकरणी मृतअशोक कोहळे यांच्या मामाने अशोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यात आमगाव पोलिसांनी तपास करून एका आरोपीला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मानेगावमधील काही तरुणांनी शेताजवळ येणाऱ्या जंगली डुक्कर मारण्याच्या हेतूने शेतात खुंट्या गाडून त्यावर सेन्ट्रिंगचे तार लावल्या व इलेक्ट्रिक पोलच्या ताराला वायरने जोडून त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरु केला होता.

जंगली डुकरे मारण्यासाठी त्यांनी लावलेल्या करंट मध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो हे माहित असताना सुध्दा त्यांनी करंट लावला होता. दुर्देवाने त्यांचाच सहकारी अशोक राजेश कोहळे याला विद्युत करंट लागून तो मरण पावला. या घटनेचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अशोक मडावी, दुर्गेश बिहारी, राधेश्याम ठाकरे यांनी सेन्ट्रिंग तार व वायर फेकून दिले. (Gondia News)

तसेच मृतदेह महादेव पहाडी गडमाता मंदीराचे मागे इलेक्ट्रिक पोल जवळील सागाच्या झाडामध्ये ठेवून पळून गेले. अशोक मडावी, (वय २६ वर्षे) दुर्गेश बिहारी, (वय ३५ वर्ष) राधेश्याम देवराम ठाकरे, (वय ४० वर्षे) व अशोक कोहळे, रा. मानेगाव अशी या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी तपास करून एका आरोपीला अटक केली आहे आणि दोन आरोपी सध्या फरार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT