Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : सागवान लाकडाची तस्करी करणारे वन विभागाच्या ताब्यात; सागवान चिरान केले जप्त

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील सडक वनपरिक्षेत्रातंर्गत शेंडा सहवन क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध सागवान तस्करी सुरू असल्याची चर्चा होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : सागवान झाडाची तोड करून त्याची तस्करी करण्यास बंदी आहे. मात्र या लाकडाची चोरून तस्करी केली जात आहे. अशाच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या सडक वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय शेंडा कोयलारी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सागवानाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे.

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक वनपरिक्षेत्रातंर्गत शेंडा सहवन क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध सागवान तस्करी सुरू असल्याची चर्चा होती. याबाबत वन विभागाला देखील माहिती मिळाली होती. या माहितीवरून वन विभागाच्या (Forest Department) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावर बारीक लक्ष ठेवले असता काही लाकूड तस्कर आपल्या घरी सागवान चिरान करीत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यानंतर त्यांनी कोयलारी गावातील संशयित निलेश मेश्राम, राधेश्याम नेवारे, बाबुदास नेवारे यांना जंगलातून सागवान तोडून त्याचे चिरान करताना त्यांच्या घरी पकडले. 

वन विभागाकडून गुन्हा दाखल 

वन विभागाच्यावतीने टाकण्यात आलेल्या धाडीत सागवान लाकूड आढळून आले आहेत. या कारवाईत त्यांच्या कडून साधारण ५२ नग ०.५२५ घनमीटर असे सागवान चिरान जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वन विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या विरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

SCROLL FOR NEXT