Tomato Theft Saam tv
महाराष्ट्र

Tomato Theft : बाजारपेठेतून चक्क टमाट्यांची चोरी; महागलेल्या टमाट्यावर चोरट्यांनी नजर

बाजारपेठेतून चक्क टमाट्यांची चोरी; महागलेल्या टमाट्यावर चोरट्यांनी नजर

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: कुठेही चोरी झाली म्हटलं की मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे समोर येते. मात्र चोरटे कधी टमाटर (Tomato) ही चोरी करतील असा कोणी विचार केला नव्हता. एरवी सहज उपलब्ध होणारा आणि दररोज भाज्यांमध्ये दिसणारा टोमॅटो आता सर्वसामान्यांच्या आवाक्या (Gondia) बाहेर गेल्याने चोरांनी चक्क टोमॅटो चोरीलाही सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्याच्या भाजी बाजारमधून टोमॅटो चोरीला गेल्याचे तक्रार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतातच सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गोंदिया शहरातील भाजी बाजारातील किशोर धुवारे यांचा भाजी विक्रीचा ठोक व्यवसाय आहे. २३ जुलैला रात्री दुकान बंद करून किशोर धुवारे घरी गेले. मागील पंचवीस वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करणाऱ्या किशोर धूवाऱ्यांना साधी कल्पनाही नव्हती केली की त्यांच्या भाजीच्या दुकानातून कधी टोमॅटो चोरीला जातील. २४ जुळायला नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा झटका बसला. त्यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडले होते. आत असलेले टोमॅटो चोरीला गेल्याचे दिसले. 

टमाटे, मिरची व रोकड लांबविली 

चोरट्यांनी जवळपास तीन ते चार हजार रुपयाचे टोमॅटोसह मिरची आणि रोकड ही चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दिली. टोमॅटो चोरीची ही घटना बाजारपेठेतील दुसऱ्यांदा घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून चोराला अटक केली आहे. मात्र टमाट्याचे दर हे गगनाला भिडले असल्याने कधी नव्हे ते बाजार आता आमच्या दुकानात पिवळ्या लागल्या आहेत.  त्यामुळे पोलिसांनी रात्रीला भाजी बाजारामध्ये गस्त वाळवावी अशी विनंती या भाजी व्यापाऱ्यांनी केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT