Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: जिल्ह्यातील जलाशय तुडूंब; रब्बी हंगामासाठी होणार फायदा

Gondia News : जिल्ह्यातील जलाशय तुडूंब; रब्बी हंगामासाठी होणार फायदा

Rajesh Sonwane

शुभम देशमुख
गोंदिया
: गोंदिया जिल्ह्यात ८० लहान मोठे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील ४३ जलाशय तुडूंब भरले असून (Gondia) सात जलाशयांमध्ये ९० टक्के पेक्षा अधिक साठा आहे. यामुळे रब्बी हंगामात धानपिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. (Latest Marathi News)

गेल्या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे भरत आहेत. यंदाही ४३ जलाशये तुडूंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. सात जलाशयांमध्ये ९० टक्केच्यावर साठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकीकडे सलग (Rain) पावसामुळे कमी कालावधीच्या धानाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे प्रकल्पांना फायदाही झाला आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत कमी साठा 

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात लहान-मोठे जवळपास ८० प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ८.१२ टक्के कमी साठा गतवर्षी गोंदिया याच तारखेत मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.९३ टक्के, लघू प्रकल्पांमध्ये ९९.७८ टक्के, मामा तलावांत ९९.३२ टक्के असा एकूण ९८.८४ टक्के साठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेत ८.१२ टक्के पाणीसाठा कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT