Gondia News Saamtv
महाराष्ट्र

Gondia Rain News: गोंदिया जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! नाल्यावरील रस्ता ओलांडताना पुरात वाहून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

गोंदिया (Gondia) जिल्यात हवामान खात्याने २६ आणि २७ जुन ला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Maharashtra Rain Update: राज्यासह देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तसेच राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक दुर्घटनाही समोर येत आहेत. गोंदियात नाल्यावरील रस्ता ओलंडताना पुरात वाहून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. (Gondia Rain Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया (Gondia) जिल्यात हवामान खात्याने २६ आणि २७ जुन ला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. गोंदिया तालुका वगळता आमगाव ,सालेकसा ,देवरी ,अर्जुनी मोरगाव ,सडक अर्जुनी ,गोरेगाव ,तिरोडा या सात तालुक्यात गेल्या २४ तासात १०७ मी मीटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

तर सर्वाधिक पाऊस अर्जुनी मोरगाव तालुक्यात पडला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावेळी एक दुर्देवी घटना समोर आली असून पिंपळगाव गावातून जाणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात काल दुपारी ३ वाजे दरम्यान एक सायकलस्वार वाहून गेल्याची घटना घडली आहे.

या सायकल चालकाची ओळख अद्याप पटू शकली नसून तहसील प्रशासनाने तालुक्यातील गावात दवंडी देत अनोळखी इसमाचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पूर ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालत प्रवास करू नये अशा सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT