Gondia News  Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : परिवार झोपेत असताना घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Gondia News : परिवार झोपेत असताना घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: परिवार गाढ झोपेत असताना घराला भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने (Fire) रौद्र रूप घेतले. या आगीत (Gondia) लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. गोंदिया जिल्ह्यात हि घटना घडली आहे. (Latest Marathi News)

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर येथे ही घटना घडली आहे. मेंदीपूर गावात वास्तव्यास असलेले लालचंद चचाने यांच्या घरातुन रात्रीच्या सुमारास धूर निघू लागला. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्न केले. परंतु आग विझू शकली नाही, यानंतर अग्निशमन विभागाला (Fire Brigade) पाचारण करण्यात आले. लगेच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या गावात दाखल झाल्या व उर्वरित आग विझविली.

रोकडसह धान्यही जळाले 

मात्र, या घटनेत लालचंद चचाने यांचे घर जळून खाक झाले असून घरातील संपूर्ण सामान जळाला आहे. घरात ठेवलेले पैसे, तांदूळ अन्य धान्य, कपडे व सोफा व अन्य पूर्णच सामान जळून खाक झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळु शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

SCROLL FOR NEXT