Gondia News Elephants  Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: शेतशिवारात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; पोल्ट्री फार्मची तोडफोड, धानाचीही केली नासाडी

Gondia News : २० ते २२ च्या समूहात असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री झाली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची गोंदियाच्या (Gondia) मोरगाव अर्जुनी तालुक्यात एंट्री झाली आहे. रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळपाने भरनोली परिसरात शेतपिकांचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरी सुकळी, बाराभाटी परिसराकडे वळविला असुन या कळपाने शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला. (Latest Marathi News)

गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात आलेल्या हत्तीच्या कळपाने कवठा बोळदमार्गे कालीमाती जंगलाकडे कूच केल्याची माहिती वन विभागाला दिली- यानंतर वन विभागाने नजीकच्या गावात दवंडी देऊन सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. २० ते २२ च्या समूहात असलेल्या रानटी (Elephants) हत्तींच्या कळपाची गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री झाली. राजोली, भरनोली, प्रतापगड, काळीमाती जंगल मार्गे बाराभाटी परिसरात दाखल झाले. ऐन धान मळणीच्या दिवसात कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वन विभागाला धडकी भरली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धान पोत्यांचे नुकसान 

राजोली, भरनोली येथील नीलकंठ हारामी यांच्या शेतात पाच एकरांतील धानाच्या पुजन्याची नासधूस करून हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला होता. १२ डिसेंबरला पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री केली असुन बाराभाटी येथे हत्तीच्या कळपाने पुरणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे या शेतकऱ्यांचे पॅक हाउस व गांडूळ खत इमारतीची नासधूस केली. या इमारतीमध्ये ठेवलेल्या धानाच्या पोत्याचे नुकसान केले. तसेच गौरव बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची देखील नासधूस केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT