Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: घरगुती वादातून वडिलांनी केली मुलाची हत्या

घरगुती वादातून वडिलांनी केली मुलाची हत्या

अभिजीत घोरमारे

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पिंडकेपार या गावातील वडिलाने आपल्या मुलाला चाकूने वार करत खुन (Crime) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी वडिलाला गोरेगाव पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Gondia Crime News)

पिंडकेपार (Gondia) येथील आरोपी वडील लोकचंद बुरले (वय 65) आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासोबत वास्‍तव्‍यास आहेत. पत्‍नीसोबत ते नेहमी भांडण करत मारहाण करत होते. त्‍यानुसार भांडण होवून मारहाण केली. याबाबत मृतक मुलगा कुलपत बुरले (वय 40) यांनी वडिलांना जाब विचारत आईला का मारहाण करत असल्याचे विचारले. यामुळे त्‍यांच्‍यात वाद झाला.

वादात पोटात खुपसला चाकू

मुलगा व वडील यांच्‍यात वाद झाला. जाब विचारल्‍याचा राग आल्‍याने आरोपीने आपल्या खिशात ठेवलेल्या चाकूने मृतक कुलपत याच्या पोटावर वार करत त्याची हत्या केली. याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी लोकचंद बुरलेला अटक केली आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Symptoms : मधुमेह म्हणजे काय? सुरुवातीची ही लक्षणे वाचाच

रणवीर सिंग किती शिकला आहे ते माहिती आहे का ?

Maharashtra Live News Update : मी नेहमी मीरा रोडमधील लोकांच्या बाजूने - प्रताप सरनाईक

Aadhar Card: लहान मुलाचं आधार कार्ड काढायचंय? ५ सोप्या स्टेप्स, घरीच मिनीटात होईल काम

Metro Yellow Line : खुशखबर! मेट्रोची पिवळी मार्गिका सज्ज, कधीपासून सुरु होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT