Gondia News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: शेतात काम करतानाच दाम्पत्यावर काळाचा घाला; तुटून पडलेल्या विद्युत तारेला झाला स्पर्श

शेतात काम करतानाच दाम्पत्यावर काळाचा घाला; तुटून पडलेल्या विद्युत तारेला झाला स्पर्श

Rajesh Sonwane

शुभम देशमुख  
गोंदिया
: भाताच्या पिकाची लागवड केलेल्या शेतात काम करताना शेतकरी (Farmer) दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. हि घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील घाटबोरी येथे घडली आहे. या दाम्पत्यासोबत असलेली एक महिला देखील जखमी झाली आहे. (Live Marathi News)

गोंदिया जिल्ह्यातील घाटबोरी येथील शेत शिवारात शेतकरी दांपत्य हे आपल्या शेतात भात पिकाच्या शेतीत कचरा काढण्याचे काम करत असताना हा अपघात झाला आहे. कचरा काढत असताना शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक (Electric Shock) लागून दोघांचा मृत्यु झाला आहे. यात पती तुळशीदास लंजे (वय ४५) व पत्नी मायाबाई लंजे (वय ४२) अशी मृतकांची नावे असुन इंदुबाई हिरालाल लंजे (वय ४३) असे जखमी महिलेचे नाव आहे. 

कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी 

विजेच्या प्रवाहीत तार पडल्याने विद्युत करंट लागून शेतकरी दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एक महिला गंभीर जखमी झाली असून जखमी महिलेवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृताच्या कुटुंबीयांना विद्युत विभागाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : 58 हजार लाडक्या बहिणींची ओवाळणी रखडली

यवतमाळ हादरले! पहाटे ५ वाजता झोपेत असताना कानाला झाला सर्पदंश; 'मण्यार' सापाच्या विळख्याने ११ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT