Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: शिक्षकाचा प्रताप..दारू पिवून वर्गातच पाय पसरून काढली झोप, व्हिडीओ व्‍हायरल

शिक्षकांचा प्रताप..दारू पिवून वर्गातच पाय पसरून काढली झोप, वीडियो वायरल

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदियात मद्यपी शिक्षकांचा प्रताप पहायला मिळाला आहे. दारू पिवून शाळेत हजेरी लावली. इतकेच नाही तर दारू अति झाल्याने या शिक्षकाने (Teacher) चक्‍क वर्गातच जमिनीवर पाय पसरून झोप काढल्याचा वीडियो वायरल झाला आहे. (Maharashtra News)

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यात असलेल्या निंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) हा प्रकार आहे. या शाळेतील शिक्षक ए. जी. मरसकोल्हे हे दारू पिऊन शाळेच्या वेळेत आले. शाळेत मद्यधुंद अवस्थेत पडलेले दिसले. अनेकांनी त्‍याचा व्‍हीडीओ देखील केला. दारूची नशा इतकी चढली होती, की आपल्‍या आजूबाजूला काय होत आहे. याची शुद्ध देखील या मद्यपी शिक्षकाला नव्‍हती.

पालकांनी केली तक्रार

सदर मद्यपी शिक्षक वर्गात झोपले असल्‍याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलावल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पालकांनी यांची तक्रार खंड विकास अधिकारी यांच्‍याकड़े केल्याचे समजून येत आहे. पोलिसांनी सदर शिक्षकाविरूद्ध गुन्‍हा दाखल केला असून मद्यपी शिक्षकावर गोरेगाव ग्रामीण रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

SCROLL FOR NEXT