Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेवरून काहींच्या पोटात दुखतंय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधांवर निशाणा

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्यातर्फे आयोजित धापेवडा उपसा सिंचन टप्पा दोन भूमिपूजन कार्यक्रमाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्ह्यात आले होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा विरोधक हसत होते. योजना सुरु झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. नोव्हेंबरमध्ये निवडणुका राहतील; म्हणून पैसे जमा करता येणार नाही. यामुळे अडवान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील बहिणीचा खात्यामध्ये आम्ही टाकतो. या योजनेमुळे आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे; असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधांवर निशाणा साधला आहे. 

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्यातर्फे आयोजित धापेवडा उपसा सिंचन टप्पा दोन भूमिपूजन कार्यक्रमाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोंदिया जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेवरून नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधत लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही असे वक्तव्य केले.

लाडकी बहीण योजना सुरू केली; त्यावेळी विरोधी पक्षातील मंडळी सभागृहामध्ये आमची गंमत करत होते. ही फसवी योजना आहे, पैसे जाणार नाही म्हणून बोलत होते. परंतु आम्ही म्हटलं हा बहिणीचा लाडक्या भावांचा वादा आहे. बहीणीचा खात्यात पैसे देऊ आणि अडीच कोटी बहिणीच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपये टाकाने आम्ही सुरू केले. आता तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील आम्ही पैसे टाकणे सुरू केले आहे. पहिले तर सांगितलं की योजना सुरू होऊ शकत नाही. सुरू झाली तर कोर्टामध्ये गेले. 

कोर्टात जाऊन सांगतात कि महिलांकरीता आणलेल्या योजना आहेत. या योजनांने सरकारी तिजोरीच्या पैशांचा चुराडा होत आहे. म्हणून या योजना बंद करा म्हणून हे कोर्टात गेले. परंतु त्यांना कुठलाही रिलीफ दिलेला नाही. कोर्टात आम्ही त्यांना कुठलाही ऑर्डर मिळू देणार नाही. कारण आमच्या बहिणीची योजना आम्ही बंद करणार नाही. ज्यांचा पाठीशी बहीणी आहेत. त्यांचेच सरकार येणार आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि पवारसाहेब तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करायचा फक्त स्वप्न पाहत राहा; असे म्हणत देखील फडणवीस यांनी टोला लगावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT