Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : रात्री मित्रांसोबत उशिरापर्यंत गप्पा; रूममध्ये जात डॉक्टराचे टोकाचे पाऊल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

रात्री मित्रांसोबत उशिरापर्यंत गप्पा; रूममध्ये जात डॉक्टराचे टोकाचे पाऊल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर रूममध्ये झोपायला गेला. यानंतर तरुण भावी डॉक्टरने (Doctor) गळफास घेत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार (Gondia) गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडला. चांदुररेल्वे (जि. अमरावती) येथील भूषण वाढोळकर (वय २४) असे मृतक डॉक्टराचे नाव आहे. (Breaking Marathi News)

भूषण वाढोलकरने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिपला सुरवात केली होती. भूषण याने २०१८ मध्येच गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (Medical Collage) वैद्यकीय शिक्षणात प्रवेश घेतला होता. याच वर्षी म्हणजे २०२३ वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षाकरिता इंटरशिप करत होता. 

महाविद्यालयाच्या वस्तीगृहातच वास्तव्यास असलेल्या भूषण हा रात्री उशिरापर्णत मित्रांशी गप्पा मारल्या. यानंतर रूममध्ये गेला असता त्याने गळफास घेतला. सकाळी उशिरापर्यंत बाहेर न आल्याने रूममध्ये राहणाऱ्या अन्य डॉक्टरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता भूषण गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनाकरिता पाठविले असून गोंदिया शहर पोलिश घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT