GONDIA ELDER ABUSE CASE SON ORDERED TO VACATE PARENTS HOUSE IN 15 DAYS Saam Tv
महाराष्ट्र

Justice For Parents : जशी करणी तशी भरणी! ज्यानं माता पित्याला घराबाहेर काढलं तोच आला रस्त्यावर

Gondia News : गोंदियात वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलावर प्रशासनाची कडक कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत घर खाली करण्याचे आदेश दिले असून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण अधोरेखित केले.

Alisha Khedekar

  • गोंदियात मुलाने आई-वडिलांना घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना

  • वृद्ध दाम्पत्याने पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे तक्रार केली

  • घर आईच्या नावावर असूनही मुलाकडून सतत छळ

  • जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाला १५ दिवसांत घर खाली करण्याचे आदेश दिले

शुभम देशमुख, गोंदिया

आई वडील म्हणजे साक्षात देवाचं रूप ही शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिली जाते. मात्र अनेक मुलं आपल्या पालकांना काही ना काही कारणांवरून नेहमीच त्रास देतात. मुल मोठं होईपर्यंत आई वडील अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. परंतु त्याच आई वडिलांच्या म्हातारपणात जेव्हा त्यांना सांभाळायची जबाबदारी पडते तेव्हा ते नकोसे होतात. अशावेळेस त्यांना एकतर त्यांच्या घरातून बाहेर काढलं जात, किंवा मग वृद्धाश्रमात पाठवलं जात. ही परिस्थिती संतापजनक आहे. अशीच एक घटना गोंदियामध्ये घडली आहे. गोंदियात एका तरुणाने आपल्याच आई वडिलांना घराबाहेर काढत त्यांच्या वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या. या बेजबाबदार आणि विकृत मुलाविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून पुढच्या १५ दिवसांत घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

गोंदियातील गौतमनगर, बाजपेयी वॉर्ड येथे राहणारे कौशल्या हरिराम मंदारकर (वय ७९) आणि हरिराम धाडू मंदारकर (वय ८६) हे वृद्ध दाम्पत्य त्यांच्या स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होते. संबंधित घर हे कौशल्या मंदारकर यांच्या नावावर असूनही त्यांचा मुलगा दिनेश मंदारकर हा वारंवार मालमत्तेच्या वादातून आई-वडिलांशी भांडण करत होता. तो त्यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे अशा प्रकारे सतत त्रास देत होता. त्यामुळे दाम्पत्याचे जीवन अत्यंत असह्य बनले होते.

धक्कादायक म्हणजे, हरिराम मंदारकर यांचा धाकटा मुलगा दिनेश मंदारकरने मोठ्या भावासोबत वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात आपल्या आई-वडिलांना घराबाहेर काढले आणि त्यांच्या वस्तूही बाहेर फेकून दिल्या. या घटनेमुळे वृद्ध दाम्पत्याला दुसरीकडे आसरा घ्यावा लागला. या अन्यायाविरोधात हरिराम मंदारकर यांनी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांतर्गत न्याय मिळवण्यासाठी अर्जही केला.

सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या स्वमालकीचे असून मुलाला त्यांच्या इच्छेविरुद्ध त्या घरात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरात सन्मानाने व सुरक्षितपणे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुलाला १५ दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी न्याय देणारा नसून समाजात ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT