Maharashtra Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Gondia News: फौजी होण्याचं स्वप्न राहिले अधुरे! १२वी परीक्षेत २ विषयात नापास; रेल्वेखाली उडी घेत विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Maharashtra Breaking News: बारावीमध्ये दोन विषयात नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. गोंदिया शहरात ही दुर्दैवी घटना घडली.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, ता. २३ मे २०२४

बारावी बोर्ड परीक्षेत आलेल्या अपयशानंतर १७ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गोंदियामध्ये घडली. मोहित पटले असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहित पटले (वय, १७ वर्ष) हा विद्यार्थी आमगाव शहरात आदर्श विद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण होता. नुकतीच मोहितने १२ वीची परीक्षा दिली होती. दोन दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षांचा निकाल समोर आला. या निकालामध्ये तो दोन विषयात नापास झाल्याची माहिती समोर आली.

दोन विषय गेल्याचे समजताच नैराश्यातून मोहित पटले याने आमगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली. मोहित हा मूळच्या आमगाव जवळील ननसरी गावातील राहणारा होता. आणि तो सैनिक भरतीची तयारी करीत होता. मात्र बारावीमध्ये दोन विषय गेल्याने त्याचे फौजी होण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले.

याच नैराश्यातून मोहित पटले याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याविषयी आमगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आणि पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: आज नवीन काही गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील; 5 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कार

Maharashtra Live News Update: लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवर एका तरुणाची आत्महत्या

Namo Shetkari Yojana: निवडणुका संपल्या, आता शेतकऱ्यांना ₹४००० कधी मिळणार? तारीख आली समोर

Surya Grahan 2026: १७ फेब्रुवारीला दिसणार सूर्याभोवती दिसणार फायर रिंग; भारतात पाहता येणार का हे ग्रहण?

Bangladesh Election 2026: बांगलादेशमध्ये BNP चा मोठा विजय, तारिक रहमान होणार पंतप्रधान; कोण आहेत?

SCROLL FOR NEXT