Gondia ZP Saam tv
महाराष्ट्र

Gondia Gram Panchayat : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ३ दिवस बंद; सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ घेतला निर्णय

Gondia News : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण तसेच धाराशिव जिल्ह्यात सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण तसेच धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनांचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. त्यानुसार बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकत्र येत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील कामकाज ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान बंद राहणार आहे.  

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंच ज्यांनी ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले. गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अशा सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड  करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकशाही तथा पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजेत यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण तसेच धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या दरम्यान तीन दिवस कामकाज बंद ठेवून शासनाचे ध्यानाकर्षण करण्याचा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने घेतला आहे.

कठोर पावले उचलण्याची मागणी 

राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असे गंभीर प्रश्न पडू लागले आहेत. अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे अशी सरपंच संघटनेची मागणी आहे. 

या न्याय मागण्यांसाठी तथा सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी २१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ दरम्यान तीन दिवस गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद अशी माहिती सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर सचिव ऍड. हेमलता चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले, उपाध्यक्ष मनीष गहेरवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT