Gold Silver Price 24 February 2023 Saam TV
महाराष्ट्र

Gold Silver Price : खुशखबर! सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरला; चांदीही झाली स्वस्त, पाहा आजचे दर

शुक्रवारी सराफा बाजार उघडताच, सोन्याबरोबर चांदीच्याही दरात मोठी घसरण झाली.

Satish Daud

Gold Silver Price Today : तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण  सोने-चांदी (Gold And Silver Price) दरात पुन्हा एकदा घसरण झाली. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने कडक धोरण घेतल्याने मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा वधारला होता. परिणामी भारतातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता त्यात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

आजचा सोन्याचा भाव काय?

गुरूवारी (23 फेब्रुवारी) सोन्याच्या (Gold Price) दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शुक्रवारी सराफा बाजारत उघडताच सोन्याचे दर काही प्रमाणात वाढतील, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना होती. मात्र, आज सराफा बाजार उघडताच, सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव तब्बल 300 रुपयांनी घसरला. त्यामुळे सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 56,610 इतका झाला आहे. दुसरीकडे 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 51,950 रुपयांवर आला आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

शुक्रवारी सराफा बाजार उघडताच, सोन्याबरोबर  चांदीच्या (Silver Price) दरातही मोठी घसरण झाली. गुरूवारी चांदीचा भाव प्रतिकिलो 65 हजार 800 रुपये इतका होता. आज त्यात तब्बल 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 65 हजार 300 रुपयांवर पोहचला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचा भाव

शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे.

सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा 2800 रुपयांनी स्वस्त

सोने सध्या त्याचा सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा तब्बल 2800 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी तिच्या उच्चांकी किंमतीपेक्षा 14800 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतीला फटका; बळीराजा चिंतेत

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT