Who are the four government-appointed directors of Gokul Milk Union? 
महाराष्ट्र

Gokul : शासननियुक्त चार संचालक कोण? गोकुळचा पडद्यामागचा खेळ सतेज पाटलांकडून संघर्ष मोर्चा सभेत उघड, राजकारणात खळबळ!

Gokul Controversy Sangharsh Morcah: गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष चिघळला आहे. कोल्हापुरातील संघर्ष मोर्चात सतेज पाटील यांनी शासननियुक्त चार संचालकांची नावे जाहीर केली. यामध्ये सांगलीतील व्यक्तीच्या नावाचाही समावेश असल्याचा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण.

Bharat Jadhav

  • शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाविरोधात कोल्हापुरात संघर्ष मोर्चा

  • राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवलंय.

  • शासनाकडून नियुक्त होणाऱ्या चार संचालकांची नावे सतेज पाटील यांनी सभेत जाहीर केली.

सरकारच्या अध्यादेशाविरोधात कोल्हापुरात काँग्रेस नेते आणि समविचारी आघाडीचे नेतृत्व करणारे आमदार सतेज पाटलांनी संघर्ष मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये बोलताना सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निकालानंतर राज्यभरात राजकारण तापलंय.

गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवणाऱ्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात 'रस्त्यापासून कोर्टापर्यंत' एल्गार पुकारला.

या मोर्चामध्ये सतेज पाटील यांनी शासनाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या संचालकांची नावे जाहीर केली. विषेश म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघाच्या संचालकपदी सांगलीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा खुलासा पाटील यांनी केलाय.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीच सतेज पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सतेज पाटील यांनी शासन नियुक्त सदस्यांची नावेच फोडली. सरकारकडून या नावांचा अध्यादेश लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय.

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर चार तज्ज्ञ संचालकांची नेमणूक झाल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मोर्चात दिली. याबाबतचा जीआर दुग्ध विकास खात्याने काढलाय, मात्र तो अपलोड करण्यात आलेला नाही. परंतु नियुक्त करण्यात येणाऱ्यांची नावे आपल्या हाती लागल्याची माहिती पाटील यांनी दिली.

सतेज पाटील यांनी चार तज्ज्ञ संचालकांची नावे मोर्चामध्ये जाहीर केली. शिवाजी अडनाईक, डॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील आणि ॲड. प्रशांत पाटोळे (सांगली) यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सरकारने वटहुकूम काढल्यानंतर काल रात्री दुग्धविकास विभागाने जीआर काढला. पण तो अपलोड केलेला नाहीये.

या नावांची घोषणा करताना सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "सांगलीतील माणसाला गोकुळमध्ये संचालक कसे केले जाऊ शकते? महायुती सरकारला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र माणूस, एकही तज्ज्ञ किंवा एकही दूध उत्पादक मिळाला नाही का?" असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तर, यामध्ये गोकुळमध्ये एका स्त्रीरोग तज्ज्ञांनी निवड कशी काय केली, त्यांना या गोकुळमधलं काय समजतंय असा सवालही त्यांन केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : हॉटेलच्या शेजारील झुडपात आढळला तरुणाचा मृतदेह; चिखलीतील घटनेनं पुणे हादरलं!

Maharashtra News Live Update: मुंबईत रॉकेट फटाके उडवण्यावर पूर्णतः बंदी; महापालिका आयुक्तांचा आदेश

Skin Care Tips For Women: महिलांसाठी खास स्किनकेअर रूटीन: चेहऱ्यावर कशाच्या नंतर काय लावले पाहिजे? जाणून घ्या

Satej Patil: कोल्हापुरातून सत्तांतराचं बीज पेरलं गेलंय, २०२९ मध्ये महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार; सतेज पाटलांचा सरकाराला इशारा

Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

SCROLL FOR NEXT