GOKUL ELECTION saam tv
महाराष्ट्र

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Gokul Milk Union Election Resolution Holder Rs 1 Lakh Bid Controversy: कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावधारकांच्या पाहुणचाराची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त भागात समावेश आहे. पावसाळ्यातच शेतकऱ्यांना पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता सतावत असताना, दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मात्र ठरावधारकांच्या पाहुणचारावर कोट्यवधी रुपये खर्च होण्याची चर्चा सुरू आहे. एका ठरावासाठी लाख रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा असून, टोकनपासून आलिशान व्यवस्था आणि सहलींच्या नियोजनापर्यंतची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा दूध उत्पादक शेतकऱ्यांना, तर निवडणुकीच्या निमित्ताने ठरावधारकांना सुकाळ, असं चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीतील खर्चाचा भार अखेर कोणावर पडणार आणि दूध उत्पादकांच्या हिताला किती प्राधान्य मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुष्काळाचे सावट, दूध उत्पादकांची चिंता कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने माळरानासह शेतशिवारातील पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो. गाय आणि म्हशींच्या दूध उत्पादनात घट झाल्यास त्याचा आर्थिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो. ठरावासाठी लाखाची बोली? एकीकडे दूध उत्पादक शेतकरी दुष्काळाशी दोन हात करण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. एका ठरावासाठी लाख रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणूक जसजशी अंतिम टप्प्यात जाईल, तसतशी ठरावांची मागणी आणि त्यासाठी होणारी आर्थिक उलाढाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टोकन, आलिशान व्यवस्था अन् सहलींचे नियोजन उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर ठरावधारकांसाठी टोकन, आलिशान व्यवस्था आणि सहलींच्या नियोजनावर कोट्यवधी रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनीही ठरावधारकांच्या व्यवस्थेबाबत जाहीर व्यासपीठावरून वक्तव्ये केल्याची चर्चा आहे. मात्र, या संभाव्य खर्चाचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे या खर्चासाठी पैसा कोण देणार आणि त्याचा नेमका स्रोत काय, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. सहा तालुक्यांतील ठरावांची संख्या गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त सहा तालुक्यांतील ठरावांची संख्याही महत्त्वाची ठरत आहे.

या सहा तालुक्यांतील ठरावांची एकूण संख्या 2 हजार 664 इतकी आहे. त्यामुळे या भागातील ठरावधारकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय गटांकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. एकीकडे दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता, तर दुसरीकडे गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांच्या व्यवस्थेवर कोट्यवधींच्या खर्चाची चर्चा. सहकारातील या निवडणुकीत ठरावधारकांचा पाहुणचार महत्त्वाचा ठरणार की दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

Jio Recharge : Jio चा धमाकेदार प्लान! एकाच SIM वर संपूर्ण फॅमिलीला अनलिमिडेट कॉलिंग अन् डेटासह अनेक फायदे

SCROLL FOR NEXT