Gokul Election Result 2026 Kolhapur latest news saam tv
महाराष्ट्र

Gokul Election Result: गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबाला धक्का! शौमिका महाडिकांचा दारूण पराभव

Kolhapur Gokul Election 2026: गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा सहकारी दूध संघ आहे. दूध उत्पादक, सहकार क्षेत्र आणि स्थानिक राजकारणाशी त्याचा संबंध असल्याने या निवडणुकीकडे राजकीय पक्षांचे आणि दूध उत्पादकांचे लक्ष असते. यात महायुतीला मोठा धक्का बसलाय.

Bharat Jadhav

  • सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीची १३ जागांवर आघाडी

  • गोकुळ निवडणुकीत शौमिका महाडिक यांना धक्का

  • सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची गोकुळ निवडणुकीत आघाडी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसलाय. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागांवर आघाडी घेत महायुतीच्या स्वप्न भंग केलाय. या निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख उमेदवार शौमिका महाडिक यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळ दूध संघाच्या संचालिका असलेल्या शौमिका महाडिक यांच्याकडे भाजपच्या निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्या पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने गोकुळच्या निवडणुकीत 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. शौमिका महाडिक यांच्या पराभवामुळे महाडिक कुटुंबासह भाजप आणि महायुतीला धक्का बसल्याचं मानलं जातंय.

महाडिकांचा पराभव महायुतीसाठी धक्कादायक

शौमिका महाडिक या महायुतीच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असून विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या भावजय आहेत. गोकुळच्या संचालकपदाचाही त्यांना अनुभव आहे. राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभव तसेच महाडिक कुटुंबाचे जिल्ह्यातील राजकीय वजन लक्षात घेता त्यांचा पराभव महायुतीसाठी धक्कादायक मानला जातोय.

एकीकडे सर्व मित्रपक्षांची एकजूट आणि दुसरीकडे प्रमुख नेत्यांचा प्रचारातील सहभाग असूनही महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाहीये. गोकुळच्या निकालाने कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT