Gokul Election 2026 Mahayuti seat sharing formula 
महाराष्ट्र

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Gokul Dairy Election 2026 : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचा बडा नेता नाराज असल्यानं उमेदवारांची नावे जाहीर करण्यास विलंब होतोय.

Bharat Jadhav

‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत धुसफुस सुरूय. अद्याप जागावाटपाची घोषणा झाली नाहीयं. हाती आलेल्या माहितीनुसार, महायुतीचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. या जागा वाटपाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदीलही दाखवला आहे. तरीही हे जागा वाटप आज जाहीर होऊ शकले नाही. त्याचं कारण आहे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची नाराजी. मंत्री हसन मुश्रीफ हे या जागा वाटपावर समाधानी नाहीत. यासंदर्भातील भूमिका ते दोन दिवसांत जाहीर करतील, अशी माहिती समोर आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, जागा वाटपात राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्या तरीही त्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाच्या एका जागेचा समावेश आहे. भाजप आणि शिवसेना प्रत्येकी सात आणि जनसुराज्य शक्तीसाठी दोन असे वाटप ठरलंय. मात्र मुश्रीफ यांनी पॅनलला बाहेरून पाठिंबा देण्याचा निरोप दिलाय. यावरून कोल्हापूरचं राजकारणात खळबळ उडालीय.

गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेला जागावाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान हा वाद मुख्यमंत्र्यांचा दरबारी गेल्यानंतर ठरावाच्या संख्याबळावर जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला होता. मात्र पक्षीय पातळीवर जागावाटप झाल्यांच दिसत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागलाय. हसन मुश्रीफांनी १० जागांची मागणी केली होती, मात्र त्यांच्या वाटाला ९ जागा आल्या आहेत. त्यामुळे नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

राष्ट्रवादी आणि यड्रावकर गट यांच्याकडे अधिक ठरावधारक असतानाही कमी जागा वाट्याला आल्यामुळे मुश्रीफ नाराज आहेत. ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलीय. त्यामुळेच जागा वाटप जाहीर होणे रखडलंय. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला निश्‍चित झाला असला, तरीही तो रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकला नाहीये. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य शक्ती पक्षाने मोट बांधली आहे. या आधी झालेल्या दोन बैठकांतही जागा वाटपाचा निर्णय लांबणीवर पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

Skin Care: ग्लोइंग स्किनसाठी रोजच्या 'या' ७ चुका ठरू शकतात घातक; जाणून घ्या आयुर्वेदानुसार अशी घ्या त्वचेची काळजी

ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा पोलिसांच्या रडारवर; आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT