chandrakant patil 
महाराष्ट्र

फडणवीसांच्या नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.

Akshay Badve

Chandrakant Patil warning to Satej Patil : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सतेज पाटलांच्या राजकीय वागणुकीवर आणि डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर थेट सवाल उपस्थित करत अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेतला. देवंद्र फडणवीस तेल लावलेला पैलवान आहे, त्यांच्या नादाला लागू नका अन्यथा एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिला.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान असून ते एकदा वटारले तर संपूर्ण साम्राज्य एका दिवसात धुळीस मिळेल, अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाण्याऐवजी राहुल गांधींकडे परवानगी मागण्यासाठी जा, असा खोचक टोलाही पाटलांना लगावला आहे.

खेळणं मिळालं नाही की लहान मूल त्रागा करतं, तेच १५ दिवसांपासून सुरू आहे

चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील १५ दिवसांपासून कोल्हापुरात जे सुरू आहे ते सर्वजण पाहत आहेत. लहान मुलाला एखादे खेळणे मिळाले नाही की ते जसा त्रागा करते, अगदी तसाच प्रकार सुरू आहे. त्यांच्या या बालिश वागण्यामुळेच लोकांनी ओळखले आहे की हे 'बंटी' आहेत, 'बंटी साहेब' नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर माणूस समजदार असावा लागतो. पण केवळ स्वतःची टिमकी वाजवून मुख्यमंत्री होता येत नाही.

आघाडीत एकटे बंटी पाटील; पवार-ठाकरे कुठेच नाहीत

सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा सतत प्रयत्न केला गेला. पण आज महायुती म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र ठामपणे उभे आहोत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत बंटी पाटील सोडून त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठेच दिसली नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला. राहुल गांधींना कोल्हापूरबद्दल काय माहिती आहे? गोकुळचे नाव जगात २१२ ठिकाणी पोहोचले आहे आणि ते चांगल्या कामामुळे पोहोचले आहे, असेही ते म्हणाले.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत

डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवर चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, एकेकाळी डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरत होते. आज एवढी अफाट संपत्ती कुठून आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे सर्व स्वतःसाठी मलाई काढण्याचे काम चालले आहे. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता, त्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणे थांबवा. आपली उंची पाहून बोला, आम्हाला डिवचले तर आम्ही सोडणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

सोनिया गांधींच्या फोनचा गौप्यस्फोट आणि जुन्या आठवणी

जनादेश पायदळी तुडवून जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले गेले, तेव्हा सोनिया गांधींशी एक कॉल झाला होता. त्या कॉलवर बंटी पाटलांनी सोनिया गांधींना कसा दम दिला होता, हे मला सर्व माहिती आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचं कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मलबार हिलमध्ये ८४ झाडांवर कुऱ्हाड; स्थानिकांचा विरोध, आंदोलनाचा इशारा

Tea And Biscuits Side Effects: रोज सकाळी नाश्त्याला चहासोबत बिस्किटे खाता? आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

NCP Merger : राष्ट्रवादीत विलीनीकरणाऐवजी तिसरा गट पडेल; महायुतीच्या मंत्र्याची शंका, राजकीय वर्तुळात ट्विस्ट

NCP Merger: बारामतीत राजकीय घडामोडींना वेग! सुनील तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटं चर्चा

Kidney Damage Risk: निरोगी किडनीला आतून पोखरतायत या 4 सवयी; तुम्हालाही असतील तर आजच बदलून टाका

SCROLL FOR NEXT