Kolhapur By-Election Saam TV
महाराष्ट्र

'मतदारांचा डेटा द्या, पास करतो'; कोल्हापूरात प्रचारासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर (पहा Video)

'कोल्हापूर निवडणुकीत माझ्या न बोललेल्या क्लिपा तयार करून संभ्रम तयार केला जात आहेत याबाबतची तक्रार मी सायबरकडे केली आहे.'

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : कॉलेजचे विद्यार्थी वापरून मतदारांचा डेटा गोळा केला जात असून त्या बदल्यात विद्यार्थ्यांना पास करण्याचे आश्वासन आणि पेटीएमद्वारे पैसे पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती केले असून या प्रकरणाकडे निवडणूक विभागाने लक्ष द्यावे अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढं म्हणाले, कोल्हापूर निवडणुकीत माझ्या न बोललेल्या क्लिपा तयार करून संभ्रम तयार केला जात आहेत याबाबतची तक्रार मी सायबरकडे केली असल्याचंही पाटील यांनी सागितलं.

सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly by-election) प्रचाराची रणधुमाळी सुरु असून भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना कोल्हापूरात रंगला आहे आणि याच वेळी विरोधी पक्षांकडून मतदारांचा डेटा गोळा करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे आणि या बदल्यात त्यांना पास करण्याचं आश्वासन आणि पैसे देखील पेटीएम द्वारे दिले जात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

SCROLL FOR NEXT