Girlfriend Cuts Boyfriend Private Part in Bhiwand Saam TV
महाराष्ट्र

Girlfriend Attack : लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसी संतापली; प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला, भिवंडीत खळबळ

Bhiwandi Crime News : तरुणीने किचनमध्ये जाऊन चाकू आणला आणि तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला.

Satish Daud

प्रियकराने लग्नाला नकार देताच प्रेयसीला राग अनावर झाला. तिने किचनमधून चाकू आणला आणि तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. ही खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) २६ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडी येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचे एका तरुणावर प्रेम जडले होते. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

यादरम्यान, तरुणीने तरुणाकडे लग्नाची मागणी घातली. पण त्याने लग्न करण्यास नकार दिला. यावरून तरुणीला राग अनावर झाला. मला शेवटी एकदा तुला लवकर भेटायचे आहे असा आग्रह तिने तरुणाकडे धरला. त्यामुळे शुक्रवारी (ता. १६) तरुणाने संबंधित तरुणीला आपल्या घरी बोलावून घेतली.

तेव्हा लग्नावरून दोघांमध्ये पुन्हा वाद (Crime News) झाला. याच वादातून तरुणीने किचनमध्ये जाऊन चाकू आणला आणि तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला. त्याने आरडाओरड केली असता तरुणीने घटनास्थळावरून पळ काढला. तरुणाचा आवाज ऐकून शेजारील लोक धावत आले त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, यासंदर्भात तरुमाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे. लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT