Love Jihad Saam Tv
महाराष्ट्र

कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी साताऱ्यात सापडली; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर काल संताप व्यक्त केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती: अमरावती येथील कथित लव्ह जिहाद प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर काल संताप व्यक्त केला होता. तसेच भाजप (BJP) व हिंदूत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या. मुलीचे अपहरन केले असा आरोप करण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेत ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांनी काही तासातच रात्री १० वाजता त्या मुलीला साताऱ्यातून ताब्यात घेतले आहे.

सदर मुलगी रेल्वेने एकटी प्रवास करत होती, ती आता सुखरूप असून पुणे व सातारा पोलिसांची यात मदत घेतली अशी माहिती अमरावती पोलीस (Police) आयुक्त आरती सिंग यांनी दिली. यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग व संपुर्ण पोलीस अधिकारी कर्मचारी यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अमरावती पोलिसांचे अभिनंदन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील १९ वर्षेीय तरुणी २ दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीवरून ती सोहेल शहा नावाच्या युवकाच्या संपर्कात होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळतच कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोहेल शहा याला ताब्यात घेतले. या मुलीचा तातडीने शोध घ्यावा यासाठी भाजप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले होते.

या प्रकरणी काल खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. या प्रकरणावरून नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. अखेरीस राजापेठ पोलिसांनी या युवतीचा शोध लावला असून ती सातारा येथे आढळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT