Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: मुलीने केला असा व्यायाम की जिम ट्रेनर हादरला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एक मुलगी जिममध्ये सुंदर अबोली रंगाची साडी नेसून आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: शरीर सुदृढ आणि फीट ठेवण्यासाठी व्यायाम करणे फार गरजेचे आहे. अनेक तरुण तरुणी आपल्या तब्येतीसाठी जिममध्ये जात असतात. अशात आजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जिमसूट घालून व्यायाम करताना मुलींना पाहिलं असेल मात्र साडीमध्ये कसरत करणारी मुलगी पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर अशाचएका मुलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Viral Video)

एक मुलगी जिममध्ये सुंदर अबोली रंगाची साडी नेसून आली आहे. साडीचं सौंदर्य राखत तिने यावर एक सुंदर टिकली लावली आहे. तसेच पायात गुलाबी रंगाचे बूट घातले आहेत. या मुलीला अशा पद्धतीने जिममध्ये आलेलं पाहून सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्यात. सहसा मुलींना साडी म्हणजे अजिबात नको असते. साडी नेसून चालता येत नाही अशी तक्रार करणाऱ्या देखील अनेक मुली आहेत. मात्र साडीमधल्या या मुलीने सर्वांचेच विचार बदलले आहेत.

रीना सिंग असे या मुलीचे नाव आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने व्हिडिओ शेअर करत ही तर सुरुवात आहे असं कॅपशन लिहिलं आहे. रीनाने साडी नेसून साधासुधा व्यायाम केलाय असं नाही. तिने डोक्यावर मोठ्या ट्रॅक्टरचा टायर उचलून घेतला आहे. तिचा हा व्यायाम पाहून सगळेच थक्का झाले आहेत.

रीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असे आणखीन काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ते म्हणतात ना एकदा डोक्यात ठरवलं की हे करायचं आहे तर ते केल्याशिवाय चैन देत नाही तसा काहीसा हा प्रकार दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगलीये. अनेक युजर्स रीनाचं कौतुक करत आहेत. तसेच अनेक मुली आणि मुलांसाठी ती एक प्रेरणास्थान असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT