Girish Mahajan viral Photo 
महाराष्ट्र

"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

Girish Mahajan viral Photo : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. महाजन यांनी हे फोटो एआयद्वारे तयार केलेले आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा केला.

Namdeo Kumbhar

Girish Mahajan, AI Generated Photos : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका तरूणीसोबत आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 'एक्स' (ट्विटर), फेसबुकसह इतर समाज माध्यमांवर या फोटोंसह मोठ्या प्रमाणात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह कमेंट्सही व्हायरल झाल्या. या प्रकरणाची जळगाव पोलिसांनी तातडीने दखल घेत सायबर शाखेत गुन्हा दाखल केला आहे.

गिरीश महाजन यांचे तरूणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मंत्री महाजन यांच्यासोबत असणारी ती तरुणी कोण? त्यांचा तिच्याशी काय संबंध? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्यावर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अखेर मौन सोडले. फोटो हे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्हायरल फोटोंबाबत प्रसारमाध्यमांनी गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे फोटो 'एआय'निर्मित (Artificial Intelligence) आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा केला. "काही विरोधकांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने हे फोटो व्हायरल केले आहेत. या प्रकरणी मी कायदेशीर तक्रार करणार आहे," असे महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी जळगाव सायबर शाखेत अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६, ३ (५) तसेच, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) आणि ६७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

महाजन नेमकं काय म्हणाले ?

हे फोटो नेमके कसे मॉर्फ करण्यात आले, याबाबत मला अद्याप कोणतीही माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणावर मी लवकरच सविस्तर खुलासा करणार आहे. सध्या जे फोटो आणि सेल्फी दाखवले जात आहेत, ते पूर्णपणे मॉर्फ केलेले आणि बनावट आहेत. माझी बदनामी करण्याच्या या जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याविरोधात मी मुंबई पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही मी प्रशासनाकडे केली आहे. लवकरच या सर्व प्रकरणाचे सत्य मी जनतेसमोर आणेन, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट येण्याच्या १० मिनिटं अगोदर दिसतात ही लक्षणं; वाचा कसा वाचवू शकाल जीव?

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी गजब कारभार

SCROLL FOR NEXT