GIRISH MAHAJAN RELATIVE ARRESTED IN FAKE KUMBH MELA WORK ORDER CASE saam tv
महाराष्ट्र

घोटाळ्या प्रकरणी गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; महाराष्ट्रात खळबळ

Girish Mahajan relative Tanay Mahajan arrested in fake Kumbh Mela work order case: कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांनी तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना अटक केली आहे. तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: कुंभमेळयाच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात जामनेरमधील तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. अटक करण्यात आलेला तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे राजकारणात देखील उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मात्र तनय महाजन याचे वडील अनंत महाजन यांनी आपल्या मुलाला या प्रकरणात फसवलं गेलं असण्याचा संशय व्यक्त केला आहे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र तपासात तनय महाजन दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही अनंत महाजन यांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे मुलाला या प्रकरणात गोवलं गेल्याचा संशय व्यक्त करत असतानाच, आरोप सिद्ध झाल्यास शिक्षेची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपी तनय महाजन नेमका कोण आहे, तो जामनेरमध्ये कुठे राहतो आणि त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याबाबत आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुंभमेळ्याशी संबंधित बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक करण्याचा नेमका प्रकार कसा घडला, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीची भूमिका काय होती, याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. नाशिकमध्ये पुढील वर्षात कुंभमेळा होणार असून शहरात 35 हजार कोटींची कामे सुरू आहे. याच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याचे समोर आले असून मंत्र्यांचे नातेवाईकांचे प्रकरणात समोर येत असल्याने कुंभमेळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT