Devendra Fadnavis  Google
महाराष्ट्र

CM relief fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मदत मिळवणं होणार आणखी सोपं; तज्ज्ञांची खास समिती स्थापन

Easier medical aid CM relief fund: या समितीचा उद्देश आजारांची यादी पुन्हा तपासणे, मदतीची रक्कम नव्याने ठरवणे आणि कोणती रुग्णालये या योजनेत सहभागी होतील, हे ठरवणे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय मदतीत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश आजारांची यादी पुन्हा तपासणे, मदतीची रक्कम नव्याने ठरवणे आणि कोणती रुग्णालये या योजनेत सहभागी होतील, हे ठरवणे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली.

समितीत कोण असणार?

या समितीमध्ये सरकारी अधिकारी आणि मोठ्या रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश आहे. प्रमुख सदस्य खालीलप्रमाणे आहेत:

अध्यक्ष: संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई

सदस्य:

  • आरोग्य संचालनालय, मुंबईचे संचालक

  • आयुष संचालनालय, मुंबईचे संचालक

  • सर ज.जी रुग्णालय, मुंबईचे अधिष्ठाता

  • लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय (सायन) चे अधिष्ठाता

  • मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग

  • माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई (डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. तात्याराव लहाने)

  • एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रमाकांत देशपांडे

  • केईएम हॉस्पिटल, मुंबईचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे

  • टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बनावली

  • कौशल्य धर्मादाय रुग्णालय, ठाणेचे संचालक डॉ. संजय ओक

  • बॉम्बे हॉस्पिटल, मुंबईचे प्राध्यापक डॉ. बिच्छू श्रीरंग

  • हिंदुजा रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. जॉय चक्रवर्ती

  • नायर हॉस्पिटल, मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजय चौरसिया

  • बॉम्बे हॉस्पिटल, मुंबईचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी

  • नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक

  • दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणेचे सचिव डॉ. माधव भट

  • मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी (सदस्य सचिव)

समिती काय काम करणार?

आजारांची यादी तपासणार

सध्या २० आजारांना मदत मिळते, परंतु काही आजार इतर सरकारी योजनांमध्ये येतात. अशा आजारांचा पुनर्विचार केला जाईल. नवीन आजार योजनेत समाविष्ट करता येतील का, याबाबत शिफारस केली जाईल.

याशिवाय सहाय्यता मिळण्यासाठी नवीन आजार समाविष्ट करण्याबाबत शिफारस करणं, रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणांमध्ये कागदपत्रांची निश्चिती करणं, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरीता आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन ( समीक्षण) करुन अनुज्ञेय रक्कम (मंजूर रक्कम) नव्याने निर्धारीत करण्याची शिफारस करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता रुग्णालय संलग्नीकरणासाठी (Empaneled) रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरव्याबाबत शिफारस करणं यासाठी याकरिता ही समिती गठीत करण्यात आल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख, रामेश्वर नाईक यांनी सांगितलंय.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत वेळोवेळी विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास ही समिती त्या विषयांबाबत शिफारस सादर करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT