Gautami Patil-Udayanaraje Bhosle Meeting Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil-Udayanaraje Bhosle Meeting: गौतमी पाटील उदयनराजेंच्या भेटीला; राजेंना दिलं खास गिफ्ट

Gautami Patil : साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी गौतमीने उदयनराजेंची सदिच्छा भेट घेतली.

ओंकार कदम

Gautami Patil News: राज्यभरात तरुणांच्या मनात अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी गौतमीने उदयनराजेंची सदिच्छा भेट घेतली.

भेटीनंतर गौतमी पाटीलने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते. (Latest News)

गौतमीने परफ्युम दिला भेट

या भेटीत तिने खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांचा आवडता परफ्युम भेट दिला. यावेळी तिने माझे जरी चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. माझी बरोबरी त्यांच्याबरोबर नको, असं गौतमीने म्हटलं.

सोलापुरात गौतमीसह तिघांविरोधात तक्रार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो झाला. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने शुक्रवारी 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते.

शोचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी आणि तिचा सहकारी केतन मारणे आणि सेक्रेटरी विनोद यांच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी गौतमी आणि तिच्या सहकाऱ्याने माझी फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT