Gautami PAtil  Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil in Solapur : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीमार

Gautami Patil News : सोलापुरात वाढदिवसानिमित्त गौतमीची कार्यक्रम आयोजित केला होता.

विश्वभूषण लिमये

Solapur News : डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कालच्या अहमदनगरमधील कार्यक्रमात दगडफेक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याची घटना समोर आली आहे.

सोलापूरच्या गौतमी पाटीलाचा कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला आहे. हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोलापूरच्या मंद्रूपमध्ये गौतमी पाटील्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त गौतमीची कार्यक्रम आयोजित केला होता. (Entertainment News)

अहमदनगरमधील कार्यक्रमात काय झालं?

नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीचा कार्यक्रम म्हणून मोठ्या संख्येने तरुणांनी येथे उपस्थिती लावली होती.

गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि तेथे दगडफेक झाली. हुल्लडबाजांच्या या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलीस आणि खाजगी बाउन्सर समोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला.

गौतमीचा इशारा

अहमदनगरमधील कार्यक्रमातील गोंधळानंतर गौतमीला कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला होता. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नसल्याचा इशाराच गौतमीने दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

Chanakya Niti: 'या' सवयींच्या लोकांना घरात बोलवणं पडेल महागात, कधीच मिळणार नाही यश; चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT