नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, आणि नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. मात्र याचं गरब्यासाठी पैसे देऊन पार्टनर मिळणार असल्याची जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाली... त्यानंतर काही ठिकाणी पार्टनर म्हणून मुलींना 1 हजार ते 5 हजारांमध्ये बोलवल्याचं समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतलाय...महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा गोरखधंदा खपवून घेणार नसल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतलीय.
दरम्यान सोशल मीडियावर कृष्णा मिस्त्री नावाच्या अकाऊंटवरून व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये गरबा पार्टनरसाठी किती रुपये मोजावे लागणार असल्याचं सांगितलयं....पाहूयात...
गरबा पार्टरनरसाठी किती पैसे मोजावे लागतील?
सिल्व्हर पॅकेज (1000 रूपये)
2 तासांसाठी गरबा पार्टनर मिळेल
मॅचिंग आऊटफिट
बेसिक स्टेप्स
क्युट सेल्फी घेतला जाईल
गोल्ड पॅकेज (1500 रूपये)
4 तासांसाठी गरबा पार्टनर मिळेल
मॅचिंग आऊटफिट
रील्स आणि इन्स्टाग्रामसाठी फोटो
इतर लोक पार्टनरला भाऊ किंवा वहिनी हाक मारू शकतात
प्लॅटिनियम पॅकेज (2000 रूपये)
संपूर्ण दिवस गरबा
बेस्ट डान्स मुव्हज
दुप्पट्टा, झुमके सांभाळले जातील
घरापर्यंत सुरक्षित सोडण्यात येईल
नवरात्रौत्सवात अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो... त्यामुळे गरब्यासाठी मुलींची बोली लावण्याचा हा प्रकार निश्चितच लाजीरवाणा आहे... पुरोगामी महाराष्ट्रात सोशल मीडियाचा वापर करून अशा पद्धतीनं पार्टनर देण्याच्या नावाखाली सुरु असलेली हा लज्जास्पद प्रकार बंद व्हायला हवा...नवरात्रीसारखा पवित्र आणि पारंपारिक उत्सव हा आनंद, ऊर्जा आणि भक्तीचा सोहळा आहे. त्यामुळे गरब्याच्या नावाखाली उत्सवाची थट्टा करून अशाप्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचा हा प्रकार थांबायला हवा... आता संभाजी ब्रिगेडनं या उडी घेतल्यामुळे यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.