वृध्देचा खून करून दागिने पळविणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद विजय पाटील
महाराष्ट्र

वृध्देचा खून करून दागिने पळविणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील धामणी येथे एका वृध्द महिलेचा खून करून चोरी केल्या प्रकरणी तासगाव पोलीसांना अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात यश आले आहे. यातील काही गुन्हेगारांवर ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील धामणी येथे एका वृध्द महिलेचा खून करून चोरी केल्या प्रकरणी तासगाव पोलीसांना अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात यश आले आहे. यातील काही गुन्हेगारांवर ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुनिल विठ्ठल तडसरे, जिवन ऊर्फ बंटी नामदेव कांबळे व रविंद्र जगन्नाथ सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे देखील पहा -

तासगाव तालुक्यातील धामणी येथे २७ जुलै रोजी शहाजी पांडुरंग पाटील यांच्या घरी एका वृध्देचा खून करून चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबतची फिर्याद सुभाष पांडुरंग पाटील यांनी तासगाव पोलीसात दिली होती. धामणी गावातील शहाजी पांडुरंग पाटील यांचा मोहिते मळा याठिकाणी दोन वर्षापुर्वी बांधलेला अलिशान बंगला असुन सदर ठिकाणी वयोवृध्द आजी श्रीमती शालुबाई पांडुरंग पाटील (वय ८०)  धामणी या एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन मुले गलाई व्यवसायानिमित्त तुतीकेरीन तमिळनाडू याठिकाणी असतात.

वयोवृद्ध आजी या नेहमी त्यांच्या अंगावर अंदाजे १०-१५ तोळे सोन्याचे दागिने परीधान करुन वावरत होत्या. हाच फायदा घेऊन आरोपींनी चोरी केली होती. पोलिसांनी सखोल तपास करत या टोळीला पकडण्यात यश मिळवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT