Parbhani, ganeshotsav 2023 saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival 2023 : गणा धाव रे... परभणीत गणेशमूर्ती विक्रेते संकटात

ganeshotsav 2023 : काही ग्राहकांनी माेठ्या मूर्तींची किंमत वाढल्याने छाेटी मूर्ती घेत बाप्पांची प्रतिष्ठापना करणार असल्याचे नमूद केले.

राजेश काटकर

Parbhani Ganpati Utsav : एकीकडे दुष्काळाचे सावट तर दूसरीकडे मागणीपेक्षा गणेशमूर्तींची विक्रीसाठी आलेली बहुसंख्या यामुळे परभणी येथे गणेश मूर्तीकार आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. अनेकांच्या गणेशमूर्ती विक्रीविना राहिल्या आहेत. त्यामुळे माेठी गुंतवणुक करुनही ताेटा हाेत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (Maharashtra News)

यंदा मराठवाड्यासह परभणी जिल्हात गणराया आगमनाबराेबरच दुष्काळाचे गडद सावट दिसत आहे. पावसाळ्याचे तीन महिने झाले पण पाऊस नाही. त्यामुळे जिल्हावर दुष्काळी परिस्थिती आली आहे. यामुळे उत्सवातील उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे.

परभणीच्या बाजारात यंदा मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या गणेशाच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. पाऊस नसल्याने व मूर्तींच्या किंमतीत 25 ते 30 टक्यांनी भाववाढ झाल्याने ग्राहकांची माेठ्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे फारसा कल दिसत नाही. परिणामी मूर्ती विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. मागच्या कोरोना काळात मूर्ती सांभाळण्याची वेळ आली होती तर ह्या वर्षी दुष्काळामुळे मूर्तींना म्हणावी तशी मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

काही ग्राहकांनी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी माेठ्या मूर्तींची किंमत वाढल्याने छाेटी मूर्ती घेत बाप्पांची प्रतिष्ठापना करणार असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT