Guhagar Accident: Saam tv
महाराष्ट्र

Guhagar Accident: टेम्पोचा ब्रेक फेल झाला अन् विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू, गुहागरमधील घटना

रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली आहे.

अमोल कलये

Guhagar Road Accident:

राज्यात सर्वत्र धुमधडाक्यात गणेश विसर्जन सुरू असताना गुहागरमधून धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. (Latest Marath News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात रस्ते अपघातातची दुर्देवी घटना घडली आहे. या गावात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ब्रेक फेल टेम्पो गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसला.

ब्रेक फेल टेम्पोमुळे गणेशभक्त जखमी झाले. तर मिरवणुकीतील या गणेशभक्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड (४८) आणि कोमल भुवड (१७) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत.

या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. या जखमींमधील तिघांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. तर दोन जखमींना उपचारासाठी रत्नागिरीमधील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात सध्या ९ जण जखमी आहेत. तर ४ जण गंभीर जखमी आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व गणेशभक्त मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणेश विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने हळू-हळू पुढे चालली होती. याचदरम्यान, एका पिकअप टेम्पोचे ब्रेक फेल झाले. यानंतर ब्रेक फेल टेम्पो मिरवणुकीत शिरला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर काही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्स सेवन करणारे 300 पेक्षा अधिक जण पुणे पोलिसांच्या रडावर|VIDEO

Air India : एअर इंडियाचा प्रवास महागला, तब्बल ₹२६००० हजारांपर्यंत तिकीट वाढले, नवे दर कधीपासून?

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

SCROLL FOR NEXT