Political News Today Saam Tv
महाराष्ट्र

Political News Today: गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात; विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला

विखें विरोधात भाजपच्या कोल्हेंची बाळासाहेब थोरातांना साथ

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Ahmednagar News: विखे - थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी विखें विरोधात भूमिका घेत बाळासाहेब थोरातांना साथ दिल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

भाजपचे विवेक कोल्हे यांनी राहाता मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सभासद आम्हालाच साथ देतील आणि थोरात - कोल्हे युतीचाच विजय होईल असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मतदान केंद्राला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रचारात दरम्यान टिका करताना विरोधकांची विकृत मानसिकता दिसून आली. मात्र व्यक्तिगत आरोपांना आम्ही खात नाही आणि त्याचे उत्तरही देत नाही.

दक्षिण नगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यावर आरोप करण्यात आले आणि इकडे कारखाना निवडणुकीत आमच्या विरोधकांसोबत भाजप गेली. मात्र आम्ही लहान बाळासारखी तक्रार करत नाही असा टोला सुजय विखेंनी पक्षांतर्गत विरोधकांना लागवला आहे. तर थोरात इकडे निवडणूक लढवायला आले आता आम्हीही संगमनेरात जाऊ असा इशारा खा. सुजय विखे यांनी दिलाय. (Ahmednagar News)

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विखे - थोरातांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेत. मतदार कुणाच्या पारड्यात कारखाना टाकणार हे १९ जूनला स्पष्ट होईल. मात्र आगामी काळात विखे - थोरात यांच्या राजकीय संघर्षाला आणखी धार येणार एव्हढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

Madhui Dixit Hair Care Tips: माधुरी दिक्षीतने काळ्याभोर केसांचं रहस्य सांगितलं, 58 व्या वर्षीही लावते फक्त या 2 गोष्टी

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SCROLL FOR NEXT