kolhapur, jitendra awhad, sindhi samaj saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा : गांधीनगरच्या सिंधी समाजाची मागणी

जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची लेखी माफी मागावी अशी मागणी होत आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad)  यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाज (sindhi samaj) संतापला आहे. सिंधी समाजाने आक्रमक होत कोल्हापूरातल्या (kolhapur) गांधीनगर बाजारपेठ येथे आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आज (शुक्रवार) निषेध केला. (Maharashtra News)

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी उल्हासनगर शहरातील आयोजित एका कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल (sindhi community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. या वक्तव्यामुळे सिंधी समाजाचा अपमान झाल्याची भावना समाजाने व्यक्त करीत आव्हाड यांचा काेल्हापूर येथे निषेध नाेंदविला.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाज संतापला आहे. सिंधी समाजाने आक्रमक होत कोल्हापूरातल्या गांधीनगर बाजारपेठ येथे आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.

यावेळी आक्रमक आंदोलकांनी आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत त्याचे दहनही केले. दरम्यान, अपमानास्पद शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांनी माफी मागावी तसेच त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी सिंधी समाजाने केली आहे.

त्या शिवाय सिंधी समाजाला हलक्यात घेऊ नका असेही म्हणत आंदोलकांनी आव्हाडांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्य बाजारपेठेतून मोर्चाद्वारे आव्हाडांचा निषेध केला गेला. या मोर्चामध्ये भारतीय सिंधी सभा, होलसेल, रिटेल व्यापारी असोसिएशनचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

SCROLL FOR NEXT