Gail Omvedt 
महाराष्ट्र

समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे वृद्धापकाळाने निधन

Siddharth Latkar

सातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ डाॅ. गेल ऑम्व्हेट Gail Omvedt उर्फ शलाका पाटणकर (वय ८१) यांचे आज (बुधवार) वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. त्यांच्यावर उद्या (गुरुवार) सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रमिक मुक्ती दलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर bharat patankar यांच्या त्या पत्नी हाेत. त्यांची कन्या प्राची, जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेत स्थायिक असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.

वृद्धापकाळामुळे डॉ. गेल यांना चालण्यात खूप अडचणी जाणवत हाेत्या. कासेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी पती डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार घेत होत्या.

डाॅ. गेल या श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या हाेत्या. आदिवासी चळवळीत त्यांचे खूप माेठे याेगदान आहे. डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीमधील कार्यकर्ते यांनी हळहळ व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT