NCP Leader Geetatai Hinge Killed in Fatal Head-On Collision Saam
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्याचा अपघाती मृत्यू; पक्षावर दुखा:चा डोंगर

NCP Leader Geetatai Hinge Killed in Fatal Head-On Collision: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील गीताताई हिंगे यांचा अपघाती मृत्यू. गडचिरोतील पाचगावात घडला अपघात.

Bhagyashree Kamble

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही अपघाताची घटना घडली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर गडचिरोलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या वाहनाचा पाचगाव येथे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी त्या कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री त्या नागपूरहून गडचिरोलीच्या दिशेनं परतत होते. दरम्यान, पाचगाव परिसरात त्यांच्या कारला विरूद्ध दिशेनं येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडक प्रचंड भीषण होती. या धडकेत गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात गीताताई हिंगे यांच्या पतींना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. दोघांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या गीताताई हिंगे यांच्या पतीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. हा अपघात नेमका घडला कसा? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गीताताई हिंगे यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT