Earthquake 
महाराष्ट्र

Earthquake: गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर भूकंपाने हादरले; नागरिकांमध्ये भीती

Earthquake: चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळी ७.३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

Dhanshri Shintre

चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सकाळी ७.३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या धक्क्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात असल्याचे दिसून आले. भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ५.३ एवढी दाखवण्यात आली.

तसेच तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जाणवले. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी ७.२९ वाजता गडचिरोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मुलगु असून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची अहेरी अल्लापल्ली चामोर्शी आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

नागपूर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे हलके धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र तेलंगणा मधील मुलुगु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे सौम्य हलके धक्के नागपूरसह काही जिल्ह्यात बसल्याच बोललं जातं आहे. सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले. नागपूरसह विदर्भातील तेलंगणाला लागून असलेल्या काही जिल्ह्यांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT