Amol Kolhe  Saam Tv
महाराष्ट्र

Amol Kolhe News: आधी मोदींकडून कौतुक, आता अमोल कोल्हेचं सूचक वक्तव्य; कोल्हे नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? चर्चांना उधाण

Amol Kolhe News: अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amol Kolhe News : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याने पुन्हा एकदा अमोल कोल्हेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं की पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये जाणार असा अर्थ होतो का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी पत्रकारांना विचारला.

लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार? याबाबत बोलातना अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणूक लढवणार का? आधी वारं बघायचं, मग आभाळ बघायचं मग शेत नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही हे आता कशाला सांगायचं, असं बोलत अमोल कोल्हेंनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. (Political News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कौतुक केलं ही आंनदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. माझं कौतुक केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये जाणार असा अर्थ होतो का? असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारला. (Latest Marathi News)

अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार? याबाबत स्पष्ट उत्तर न देणे. या सर्व घडामोडींमुळे अमोल कोल्हे यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

SCROLL FOR NEXT