friends provides copy to ssc students in nandurbar  saam tv
महाराष्ट्र

SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

Nandurbar : उपद्रवी केंद्र म्हणून काही परीक्षा केंद्र घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रावर पोलिस प्रशासन विशेष लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले हाेते.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

राज्यात आज (शुक्रवार) इयत्ता दहावीच्या परीक्षेला (ssc exam 2024) सुरुवात झाली. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना माेठ्या धाडसाने काही मुलं काॅपी पूरविण्यासाठी धडपड करीत हाेते. यामुळे काॅपीमुक्त परीक्षा या अभियानास पहिल्याच दिवशी हरताळ लागल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात हाेते. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील 49 परीक्षा केंद्रातून 21 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. आज परीक्षेचा पहिला दिवस हाेता. या परिक्षेसाठी बैठी आणि भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शाळा परिसराच्या बाहेरून कॉपी पुरवली जाऊ नये यासाठी विशेष पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. केंद्राच्या 200 मीटरच्या आतील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच 100 मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील एका शहरात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईकांची धडपड दिसून आली. या केंद्रावर कॉपी बहाद्दरांसाठी नातेवाईक भिंतीवर चढून खिडकीतून विद्यार्थ्यांना कागदाच्या चिठ्ठ्या देत असल्याचे व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेत. या घटनेची शिक्षण विभाग नाेंद घेणार का अशी चर्चा देखील हाेऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT