shivsena  Saam tv
महाराष्ट्र

राज्यात मोठं काही तरी घडणार? शिंदे गटातील नाराजी उघड, अब्दुल सत्तारांनंतर आणखी एका नेत्याकडून खदखद व्यक्त

eknath shinde news : शिंदे गटातील नाराजी उघड झाली आहे. अब्दुल सत्तारांनंतर संजय गायकवड यांनीही नाराजीला दुजोरा दिला आहे.

संजय जाधव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग

अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्याकडून खदखद व्यक्त

संजय गायकवाड यांनी नाराजीला दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत डावलल्यामुळे राजकीय नेते उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचे म्हणत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा दिला. सत्तार यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नाराजी उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात विधानपरिषदेसाठी १७ जागांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या वाटेला मोजक्याच जागा आल्या आहेत. या निवडणुकीत निवडक नेत्यांनाच उमेदवारी मिळाल्याचे दिसून आलं. परंतु काही नेत्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे दिसून आलं.

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातील उमेदवारीवर सत्तार कुटुंबीयांना दावा केला होता. परंतु शिंदे गटाने अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर या निवडणुकीत समीर सत्तार यांनी बंडखोरी केल्याचे समोर आलं आहे. सत्तार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. शिवसेनेला संपवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. सत्तार यांच्या वक्तव्याला आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा दिल्याने राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?

आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'भाजप शिवसेनेला संपवेल ही अब्दुल सत्तारांची व्यथा खरी आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्तेत येता आलं आणि दुसऱ्यांदा सत्ता भोगता आली. दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण करून देखील कारवाई झाली नाही. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचं अर्थ खाते देखील अजून देत नाहीत. भाजपचे काही ज्येष्ठ नेते माझ्या मतदारसंघातील लक्षवेधी देखील लावू देत नाहीत.

तत्पूर्वी, आमदार संजय गायकवाड यांनी देखील भाजपावर तीव्र नाराजी आणि खदखद व्यक्त केली. माझ्या मतदारसंघात देखील मित्रपक्ष असलेल्या भाजप अन्याय करत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT