Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News : वरातीत डान्स करताना तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ व्हायरल...

जालना तालुक्यातल्या बेथलम गावातील येथील घटना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना - सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नातील अनेक वेगळे किस्से व्हायरल होत आहेत. त्यातच आता लग्नातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील हाणामारी पाहून तुम्ही आश्चर्यचिकत व्हाल. लग्नाच्या वरातीत डान्स करताना एका तरुणच दुसऱ्या तरुणाला धक्का लागला आणि मग त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. भांडण सोडवण्यासाठी अनेक लोक मदत करतात. पण ही हाणामारी काही केल्या थांब नाही.

लग्नाच्या वरातीत डान्स करण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना जालना (Jalna) तालुक्यातल्या बेथलम या गावात घडली आहे. या फ्री स्टाईल हणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जालन्यात घडली आहे.

बेथलम गावामध्ये चर्चच्या समोर लग्नाची वरात आली असताना सागर निर्मल हा तरुण नाचत असताना त्याचा धक्का एका तरुणाला लागताच त्या तरुणांनी त्याला धक्का बुक्की करत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या आणखी चार ते पाच तरुणांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली.ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून त्या तरुणाच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT